राजगुरूनगरमध्ये गॅस ग्राहकांची फसवणूक

  • सिलेंडरच्या वजनात घट : प्रांत, तहसीलदारांची अचानक धाड
  • आनंद आणि लुणावत दोन्ही एजन्सीमध्ये वजनात गडबड

राजगुरूनगर: घरगुती व व्यावसायिक वापरात आलेल्या गॅस सिलेंडरच्या वजनात एक ते दोन किलो घट येत असल्याची तक्रारी आल्याने सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद खेडच्या तहसीलदार अर्चना यादव यांनी अचानक दोन एजन्सीवर आज सकाळी धाड टाकून चौकशी केली. या कारवाईत एका मोठ्या एचपी गॅस एजन्सीमध्ये 17 भारत गॅसचे सिलेंडर आढळून आले असून, दोन्ही एजन्सीमधील सिलेंडरच्या वजनात घट सापडली असल्याची माहिती प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयुष प्रसाद यांनी सांगितले की, राज्य गुप्तचर वार्ता आयोगाकडून आलेल्या सर्वेक्षणानुसार राजगुरूनगर शहरातील एचपी कंपनीच्या आनंद गॅस एजन्सी व लुणावत गॅस एजन्सी या दोन एजन्सीवर घेतलेल्या सिलेंडरच्या वजनात घट असल्याची ग्राहकांनी तक्रार केली होती. त्यानुसार आज सकाळी राजगुरूनगरमधील आनंद गॅस एजन्सी व लुणावत गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. आनंद गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वजनात काही ग्रॅमची घट आली. तर लुणावत गॅस एजन्सीमध्ये उपलब्ध गॅस सिलेंडरच्या वजनात अर्धा ते एक किलो पर्यंत घट दाखविली आहे. याबरोबच या गोडावूनमध्ये भारत गॅसची रिकामी 17 गॅस सिलेंडर सापडली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लुणावत गॅस एजन्सी व आनंद गॅस एजन्सीमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. सर्च वॉरंटनुसार सर्च केले असता आवश्‍यक साधन सामग्री आढळून आली नाही. या एजन्सीचे डीटेल्स तपासण्यासाठी एचपी कंपनी व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वजनात गडबड केली जात असल्याची गंभीर बाब असून जिल्हाधिकारी यांचेकडे कारवाईसाठी मागणी केली आहे. याचा अहवाल खेडच्या तहसीलदार अर्चना यादव पाठविणार आहेत.

नागरिकांनी गॅस एजन्सी कडून मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचे वजन करून घ्यावे. त्यात तफावत आढळल्यास तात्काळ तक्रार दाखल करावी, त्याची दखल घेतली जाईल.
-आयुष प्रसाद, प्रांताधिकारी खेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)