राजगुरूनगरच्या “श्री समर्थ’मध्ये पालखी सोहळा

चिंबळी – श्री समर्थ प्रशासन मंडळ संचालित चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेजच्या वतीने राजगुरूनगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रथमच आषाढीवारीचे औचित्य साधून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोषाख परिधान करून गळ्यात टाळ, मुखी ज्ञानोबा-माऊली-तुकारामच्या जयघोषात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जाऊन दर्शनाला लाभ घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराजांचे अभंग गात फेर धरीत फुगड्या खेळल्या. या सर्व लहान मुलांचे व शिक्षकांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, चिंबळी फाटा स्कूल व कॉलेजच्या प्राचार्य अनिता टिळेकर, राजगुरूनगर स्कूलच्या प्राचार्य सपना टाकळकर व सर्व शिक्षिका व कर्मचारी, पालक उपस्थित होते.
राजगुरूनगर : येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढीवारीचे औचित्य साधून पालखी सोहळा आयोजित केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.