राजगुरूनगरची 32 टक्‍क्‍यांनी करवसुली घटली

राजगुरूनगर- राजगुरुनगर नगरपरिषदेने 2017-18 या आर्थिक वर्षात 58 टक्के वसुली झाली असून गेल्या वर्षी हीच वसुली 90 टक्के झाली होती, त्यामुळे यंदा तब्बल 32 टक्‍क्‍यांनी ही वसुली घटली आहे. थकबाकीदारांनी तत्काळ कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.
राजगुरूनगर परिषद यावर्षी मार्च अखेर 11 हजार सदनिका धारकांकडून घरपट्टी व इतर करापोटी 1 कोटी 16 लाख 69 हजार रुपये कर वसुली झाली आहे. 3 हजार 565 करधारकांकडून 87 लाख 03 हजार रुपयांची वसुली बाकी आहे. गेली तीन वर्षांपासून अनेकांनी नगरपरिषदेचा कर भरलेला नाही. नगरपरिषदेच्या हद्दीत वेळेवर कर न भरणारे 200 पेक्षा अधिक थकबाकीदार आहेत. अशा थकबाकीदारांना कर भरण्याबाबत नोटीसा पाठविण्याचे काम सुरू आहे. कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात खेड न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असून त्याद्वारे थकीत कर वसुली करण्यात येणार आहे. यासाठी लोकन्यायालयाचा आधार घेतला जाणार आहे.
मागील वर्षी सुमारे 90 टक्के कर वसुली झाली होती यावर्षी मात्र त्यात 32 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मागील वर्षी राजगुरुनगर नगरपरिषदेची कर थकबाकी भरावी यासाठी वसुली बॅंडपथकाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले. यासाठी नगरपरिषदेतील सुमारे 150 कामगारांनी शहरातून वाजत गाजत जनजागृती रॅली काढली होती. दारात वसुली बॅंडपथक पाठवून वसुली, कर न भरणाऱ्या व्यक्ती, संस्थांची बॅंक खाती गोठविणे, नळ जोड बंद करणे, प्रॉपर्टी जप्त करणे आदी पर्यायाची अवलंबन करण्यात आला होता त्यामुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा कसल्याही प्रकारची जनजागृती करण्यात न आल्याने यंदा कर वसुली घटली आहे. या थकबाकीदारांमध्ये राजगुरुनगर शहरातील मोठे बिल्डर्स, शासकीय कार्यालये आणि काही नागरिक यांच्याकडे कर थकबाकी मोठी आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांची जागृती केली आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून 3 हजार 565 नागरिकांना कर वसुली नोटीसा पाठविण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.

  • यंदा निधी मिळणार की नाही?
    शासन निर्णयानुसार ज्या नगरपरिषदेची थकबाकी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वसुली होईल त्या नगरपरिषदेत मोठ्या योजना राबविण्यासाठी निधी दिला जातो. या माध्यमातून अनेक विकास कामे केली जातात मात्र, राजगुरुनगर शहरातील अनेक थकीत करधारकांनी कर भरला नसून यंदा ही वसुली तब्बल 32 टक्‍क्‍यांनी घसरली असल्याने यंदा राजगुरूनगर नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधी मिळणार की नाही हा प्रश्‍न अता उपस्थित झाला आहे.
  • ग्रामपंचातीच्याच दराने कर वसुली
    राजगुरुनगर ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हा कर आकारणी दर निश्‍चित केले होते. मात्र नगरपरिषदेत करनिर्धारण अधिकारी पद भरले नसल्याने नव्याने कर आकारणी करण्यात आली नाही. जुन्या दरानेच कर वसुली सुरू आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर नावातील चुका आणि जीर्ण झालेली जुनी कर वसुलीची पुस्तके यामुळे कर वसुलीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. जुना डेटा संगणकावर उपलोड केला आहे. कर वसुलीत अचूकता आणण्यासाठी सर्व नागरिकांच्या कर नोंदी संगणकावर ऑनलाईन उपलोड करण्यात आली आहेत.
  • नगरपरिषदेची कर वसुली सुरू आहे. यावर्षी हे प्रमाण कमी असले तरी नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन केले आहे. ज्या नागरिकांनी कर थकबाकी भरली नाही त्यांना नोटीस पाठविण्याचे काम सुरू आहे. जे थकीत आहेत. त्याची प्रकरणे खेड न्यायालयात दाखल केली जाणार आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी थकीत कर धारकांनी तत्काळ नगरपरिषदेत कर भरावा.
    – मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)