राजकीय पक्षांसमोर होणार ईव्हीएमची चाचणी

संग्रहित छायाचित्र....

जिल्हा प्रशासनाला नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन प्राप्त


प्रशासनाकडून मशीनची प्राथमिक तपासणी सुरू

पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे नवीन ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपीएटी मशीन प्राप्त झाल्या आहेत. या मशीनची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. सध्या ऑनलाईन प्रणालीमध्ये मशीनची नोंदणी घेण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून ईव्हीएम योग्य प्रकारे काम करत असल्याची चाचणी घेतली जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षांची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा वापर नको, अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. ईव्हीएम मशीनच्या ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूक विषयक कामकाजाची माहिती या बैठकीत राजकीय पक्षांना देण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपीएटी (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली जाणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मशीनच्या बाजूलाच व्हीव्हीपीएटी जोडले जाणार आहे. ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपीएटी मशीनच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेकंद दिसणार आहे.

पुणे जिल्ह्यासाठी 16 हजार 690 बॅलेट युनिट, 9 हजार 762 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी 9 हजार 762 मशीन दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी मशीन असणार आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार आहे. याची माहिती राजकीय पक्षांना होण्यासाठी तसेच मशीन योग्य प्रकारे काम करत असल्याची तपासणी लवकरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)