राजकीय आघाडीचे सर्वाधिकार अखिलेश यादवांकडे

लखनौ – समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांशी आघाडी आणि जागा वाटप करण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांना दिले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक झाली त्यात पक्षाध्यक्षांना हे सर्वाधिकार देण्यात आले.

लोकसभेची निवडणूक इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्राद्वारे न घेता मतदान पत्रिकेद्वारे घेण्यात यावी अशी मागणीही पक्षाच्या कार्यकारीणीने केली आहे. आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारीणीला मोहंमद आझम खान यांच्या सारखे काही नेते अनुपस्थित होते त्या विषयी विचारले असता रामगोपाल यादव म्हणाले की, दरवेळी सर्वच सदस्यांनी उपस्थित राहण्याचे बंधन नाहीं. आजच्या बैठकीला नव्वद टक्के सदस्य उपस्थित होते तेवढे आमच्यासाठी पुरेसे आहेत असेहीं त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)