राजकारणाचे जोडे सोडून काम करा

आमदार दत्तात्रय भरणे यांचे मत

रेडा- शालेय जीवनात शिकत असतानाच सामाजिक जीवनाचे भान ठेवून आमच्या भरणेवाडी, अंथुर्णे भागात असणारे राजकारण विसरून शाळेत येताना -जाताना जनतेला मदत करायची, याची जाणीव ठेवली. त्यामुळे 1992 मध्ये छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आलो. गंगावळण गावचे महारुद्र पाटील यांनी सामाजिक कामात महत्त्वाचे योगदान दिले म्हणूनच दुसऱ्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाचा मान महारुद्र पाटलांना मिळाला. त्यामुळेच राजकारणाचे जोडे बाजूला सोडून काम केले तर जनता विसरत नाही, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्‍त केले.
गंगावळण (ता. इंदापूर) येथे ग्रामपंचायत व पर्यटन विभागाच्या अंतर्गत विश्रामग्रह व स्वागत कमान तसेच वरकुटे बुद्रुक ते गंगावळण रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंगल सिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, प्रताप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, किसन
जावळे, कालिदास देवकर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव माने, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, अनिल बागल, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, गंगावळण गावचे सरपंच देविदास वगरे, गावच्या उपसरपंच प्रतिभा पाटील, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर जगताप, प्रमोद लोंढे, सुनील सोनवणे, आशा बोंगाने, अबोली पवार, लक्ष्मी हिवरे व ग्रामसेवक प्रमोद पाटील, गावकरी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, तालुक्‍यातील रस्त्यांची कामे व इतर विकास कामे मार्गी लागत आहेत. गंगावळणला पर्यटनस्थळ पाहिजे यासाठी स्वतः आराखडा बनविण्यासाठी प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.
यावेळी महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, राजेंद्र तांबिले, प्रतापराव पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. सरपंच देवीदास वगरे, उपसरपंच प्रतिभा पाटील यांनी स्वागत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)