रहाटणी, वाकड परिसरातील हॉटेल्सवर कारवाईची मागणी

पिंपरी – रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ग्राहक हक्क संघर्ष समिती व ग्राहक सेवा संस्थेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात समिती व संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकड परिसरातील बहुतांश हॉटेल सरकारचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. येथील हॉटेल्स प्रशासनाला न जुमानता पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्यासाठी नाईट चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून लूट केली जाते.

सर्वच पदार्थ वाढीव किंमतीत विकले जातात. त्याला विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत हॉटेल चालकांची व कर्मचाऱ्यांची मजल गेली आहे. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण आहे. त्याची दखल घेऊन या परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच समाजिक सलोखा व शांतता ठेवण्यासाठी अवैधपणे चालणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)