रहाटणी, काळेवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

पिंपरी – रहाटणी-काळेवाडी परिसरात एकाच महिन्यात दोघा जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी रहाटणी-काळेवाडी परिसरात प्रामुख्याने बळीराज मंगल कार्यालय चौक, रहाटणी फाटा आदी ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी रहाटणी-काळेवाडी येथील शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्यात म्हटले आहे की, रहाटणी-काळेवाडी परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनत चालल्याचे चिञ सध्या पहावयास मिळत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न अतिशय गंभीर होत चालला आहे. एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने गुन्हेगार गुन्हा करून सहज मोकाट पळून जाण्यासाठी यशस्वी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिसरात एकाच महिन्यात दोन जवळच असलेल्या ठिकाणी दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. खुनासारख्या दोन घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चौकाचौकात टोळके उभे राहत असल्याने नागरिकांना आणि महिला वर्गाला खूप ञास सहन करावा लागत आहे. येत्या पंधरा दिवसांत परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)