रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्रासाठी 397 कोटींचा निधी

मुंबई – मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्रासाठी 397 कोटींचा निधी देणे, फाळणीनंतर राज्यात आलेले निर्वासित नागरिकांना शासनाकडून दिलेल्या जमिनी फ्रि-होल्ड करणे, राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करणे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांचा समावेश, बृहन्मुंबईतील शासकीय जमिनींवरील भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरण धोरणात सुधारणा करणे हे निर्णयघेण्यात आले.मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना जिल्ह्यात मराठवाडा उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 396 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चासह 121 शिक्षकीय व 158 शिक्षकेतर पदे निर्माण करण्यास  मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेने मागील 81 वर्षांत संशोधन व नाविण्यपूर्ण कार्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या संस्थेत 687 पूर्णवेळ पीएचडी संशोधक आणि 380 मास्टर्स विद्यार्थी संशोधन करीत आहेत. येथील संशोधकांनी अनेक पेटंट घेतली असून या संस्थेत विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्रात उपयुक्त ठरत आहे. त्यामुळेच या संस्थेला महाराष्ट्र सरकारने आयआयटी, आयआयएससी आणि आयआयएसईआर यांच्याप्रमाणे विशेष दर्जा आणि उत्कृष्ट केंद्र म्हणून मान्यता दिली असून, संस्थेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)