रश्‍मी देसाई ‘या’ आजाराशी झगडतेय

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्‍मी देसाई गेल्या काही दिवसांपासून कॅमेऱ्यापासून दूर राहिल्याचे आपण पाहत आहोत आहे. परंतु, नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यात रश्‍मीचे वजन फार वाढलेले दिसते. याधीही रश्‍मीला वजन वाढल्यामुळे बरंच ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे आता तिने स्वतःच सर्वच गोष्टींपासून दूर राहणे पसंत केले आहे,

मागील काही दिवसांपासून रश्‍मी सोरायसिस या आजाराशी झगडत आहे. याबद्दल तिने स्वतःच सांगितले. शिवाय या आजारामुळे तिचे वजनही वाढल्याचे सांगत डॉक्‍टरांनी तिला दिवसा घराबाहेर पडण्यास मनाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण उन्हात घराबाहेर रश्‍मी पडली तर या आजारात अजून वाढ होऊ शकते. याबद्दल सांगताना रश्‍मीने, गेल्या काही दिवसांपासून मी आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरी जात आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात मला सोरायसिस असल्याचे कळले. कोणताही आजार पूर्ण बरा होण्यासाठी काही काळ लागतो. असंही होतं की आजार पूर्ण बरा कधीच होत नाही. या आजारासाठीच मी स्टेरॉइड ट्रीटमेंट घेत होती. असे म्हटले आहे. तसेच या आजारामुळे आणि त्यावरी औषध उपचारांमुळे माझं वजन प्रचंड वाढलं. मी यावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही रश्‍मीने म्हटले आहे. रश्‍मीचा जन्म एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. तिला पहिल्यापासूनच मॉडेलिंगची आवड होती. दरम्यान, तिला भोजपुरी सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, छोट्या पडद्यावरील उतरन या मालिकेमुळे ती सर्वांच्या मनात घर करून गेली.

https://www.instagram.com/p/BzgL-4ognSJ/

Leave A Reply

Your email address will not be published.