रनवीरबरोबर काम करणे बऱ्याच दिवसांपासून बाकी होते- करीना

करीना कपूर आणि रणवीर सिंह हे दोघेही करण जोहरच्या “तख्त’या पिरीएड ड्रामामध्ये एकत्र असणार आहेत. बॉलिवूडच्या पडद्यावर ही जोडी प्रथमच झळकणार आहे. रणवीर सिंहबरोबर काम करणे बऱ्याच दिवसांपासून बाकी होते, असे करीना म्हणाली.

रणवीर हा या पिढीचा सर्वात अभूतपूर्व कलाकार आहे. रणवीरबरोबर काम करणे बऱ्याच दिवसांपासून बाकी होते. त्याच्याबरोबर काम करणे हा एकप्रकारचा बहुमान आहे आणि सरतेशेवटी त्याच्या बरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळालीच असे ती म्हणाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बऱ्याच कालावधीनंतर धर्मा प्रॉडक्‍शनबरोबर काम करत असल्यामुळे “तख्त’ हा सिनेमाही करीनासाठी खूप स्पेशल आहे. यापूर्वी धर्मा प्रॉडक्‍शनसाठी तिने अनेक सिनेमे केले आहेत. पण करण जोहरच्या डायरेक्‍शनखाली काम करण्याची वेळ बऱ्याच दिवसांनी तिला मिळाली आहे.

करण जोहर अगदी जवळच्या मित्रांपैकी एक आहे. खरे तर तो आपला भाऊच आहे. ज्याच्यावर अधिक विश्‍वास असावा, असा करण आहे. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा करण आणि धर्मा बरोबर काम करते तेंव्हा करीनाला घरीच असल्यासारखे वाटते. “तख्त’मध्ये करीनाबरोबर अलिया भट,भूमी पेडणेकर, विकी कौशल, जान्हवी कपूर आणि अनिल कपूरही असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)