रत्नागिरी, कर्नाटक हापूसच्या भावात घसरण

आवक वाढल्याचा परिणाम


पुढील आठवड्यात आणखी भाव घटण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

पुणे – आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी, कर्नाटक हापूसच्या भावात घट झाली आहे. रत्नागिरी हापूसच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेटीमागे 1 हजार रुपयांनी, तर कर्नाटक हापूसच्या भावातही सुमारे 30 टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात आंब्याचे भाव आणखी कमी होतील, असा अदांजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
रविवारी मार्केट यार्डातील फळ विभागात सुमारे 10 हजार पेटी रत्नागिरी हापूसची आवक झाली. 4 ते 8 डझनाच्या कच्च्या आणि तयार आंब्यास अनुक्रमे 1 ते अडीच हजार आणि दोन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. याविषयी रत्नागिरीची व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कच्च्या आंब्याच्या भावात पेटीमागे 1 हजार रुपयांनी, तर तयार आंब्याच्या पेटीमागे 500 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या बाजारात आलेले कच्चे आंबे 8 ते 10 दिवसांनी तयार स्वरूपात मिळतील. त्यावेळी तयार आंब्याच्या भावात आणखी घसरण होईल. पुढील काही दिवसात आंब्याची आवक आणखी वाढणार आहे. त्यावेळी भावात आणखी घसरण होईल. आंब्या खाण्याची ही योग्य वेळ आहे.
कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, कर्नाटक आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रविवारी तब्बल 30 हजार पेटी आंब्याची आवक झाली. त्यामुळे सर्व प्रकारच्या आंब्याच्या भावात सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. रविवरी कर्नाटकच्या चार डझनाच्या हापूस आंब्यास 700 ते 1400 रुपये, 4 डझन पायरी आंब्यास 500 ते 800, लालबाग आणि मलिका आंब्यास प्रती किलो 30 ते 40, बदाम आंब्याला प्रती किलो 30 ते 55 रुपये भाव मिळाला. आवक वाढल्यास पुढील आठवड्यात आंब्याच्या भावात आणखी घसरण होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)