‘रणांगण’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…

मुंबईत हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या ‘रणांगण’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग बरोबरच संगीतातील दिग्गज अवधूत गुप्ते, राहुल रानडे, गुरू ठाकूर आणि कलाकार सचिन पिळगावकर, प्रणाली घोगरे, आनंद इंगळे ही कलाकार मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते.

ट्रेलरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्याबरोबरीने दिसलेले संजय नार्वेकर, मुक्ता बर्वे हे चेहरे. यांची भूमिका नेमकी काय असणार हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहेच. पण एक सुंदर, मनोरंजनात्मक चित्रीकरण ‘रणांगण’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार एवढे चित्रपटाच्या ट्रेलरवरून नक्की लक्षात येते.

दिग्दर्शक राकेश सारंग यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत लाभले आहे. तर एक गाणे सचिन पिळगावकरांनीही संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे.

गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी या चित्रपटाला साजेशी गाणी लिहिली असून, आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर या चित्रपटाच्या गीतांना लाभले आहेत. आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा ५२ विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मीडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट येत्या ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)