रणवीरला लक्‍झरी कार कलेक्‍शनचीही आवड 

बॉलीवूडचा “बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंह हा आजच्या तरूणांच्या गल्यातील ताईत बनला आहे. अभिनयाबरोबरच त्याचा बिनधास्त अंदाज आणि ड्रेसिंग स्टाइल सर्वांना आवडते. त्याचे चाहतेही त्याची ही स्टाइल फॉलो करत असतात. कपड्यांसोबत रणवीर सिंहला लक्‍झरी कार कलेक्‍शनचीही आवड असल्याने त्याच्याकडे अनेक लक्‍झरी कार्सचे कलेक्‍शन आहे.
रणवीर 86 लाख रुपये किंमत असलेली टोयोटा लॅंड क्रूजर ही कार फार चालवत नाही. पण त्याच्या कलेक्‍शनमध्ये ही कार आहे. त्याने ही कार आपल्या करिअरच्या सुरुवातीला खरेदी केली होती. ऑडी क्‍यू 5 या कारचाही रणवीरकडे असलेल्या एकापेक्षा एक आलिशान कार कलेक्‍शनमध्ये समावेश आहे. 55 लाख रुपये या कारची किंमत आहे.
मारूतिची सीयाजसप अनेक बॉलिवूड कलाकारांची रेंज रोव्हर वॉग ही शानदार आणि आलिशान कारही रणवीरकडे आहे. या कारची किंमत 1.60 कोटी रुपये आहे. तर एस्टन मार्टिन रॅपिड एस त्याच्या कलेक्‍शनमधील ही सर्वात फेवरेट कार आहे. रणवीरने ही 4 कोटी रुपयांची कार आपल्या वाढदिवसाला स्वत:ला गिफ्ट केली होती.
रणवीर दररोज कुठे येण्या-जाण्यासाठी मर्सिडीज इ क्‍सास या कारचा वापर करतो. मर्सिडीज बेंज जीएल क्‍लास ही कारही रणवीरच्या आवडत्या कारपैकी एक आहे. रणवीर सिंह जाग्वार एक्‍सजेएल ही कार अनेकदा वापरतो. या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)