रजोनिवृत्ती आणि हृदयविकार (भाग २)

डॉ. मेधा क्षीरसागर 

भावनिक अस्थैर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते. या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते.

महिलांमध्ये वाढत्या मधुमेहाबाबत खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे धक्‍कादायक निष्कर्ष जाहीर झाले आहेत. 25-35 या वयोगटातील महिलांमध्ये रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढत आहे. तर 30-35 वयोगटातील महिलांमध्ये मधुमेहफ वाढताना दिसतो. ही धोक्‍याची घंटा असल्याचे मत डॉक्‍टर व्यक्‍त करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात 6 कोटी 10 लाख मधुमेही आहेत. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारतात 10 कोटी लोकांना मधुमेहाची लागण होण्याची शक्‍यता आहे. मधुमेहामुळे मृत्यू होण्याची संख्याही लक्षणीय आहे.

मुंबईतील 65 टक्‍के तर पुण्यातील 30 टक्‍के महिलांना मधुमेहाची लागण झाली आहे. विशेषत: 25-35 या वयोगटातील महिलांच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आहे. आता 30-35 वयोगटातील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढू लागले. तेलकट, तिखट आणि अधिक प्रथिनेयुक्‍त आहारामुळे गृहिणींमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढू लागल्याचे डायबेटिक असोसिएशन इंडियाचे डॉ. अनिल बारोस्कर यांनी सांगितले. मधुमेहाच्या तपासणीसाठी महिला पुढाकार घेत नाहीत. चिंतेची बाब म्हणजे महिलांप्रमाणे 12-22 वयोगटातील युवकांमध्ये मधुमेह-2 चे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

काही व्याधी अशा आहेत की, अद्याप त्यावर जगात उपाय वा औषध सापडलेले नाही. दिवसेंदिवस ऑक्‍टोपसप्रमाणे हातपाय पसरत असलेला मधुमेह हा त्यापैकीच एक होय. मधुमेह ही व्याधी भारतात तर इतक्‍या मोठया प्रमाणात वाढत आहे की, भारत ही मधुमेहाची राजधानीच मानली जाते.

मधुमेहींच्या पायाच्या जखमा आणि त्यातून होणारा जंतुसंसर्ग यांच्या उपचारात रक्‍तातील साखरेच्या प्रमाणावर चटकन्‌ नियंत्रण आणणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी रुग्णाला दाखल करून नियमितप्रमाणे रक्‍तातील साखरेचे प्रमाण तपासून त्यावर इन्सुलीन आणि इतर औषधांच्या मदतीने नियंत्रण आणणं जरूरीचं असतं. त्याशिवाय पायाच्या डॉक्‍टरी किंवा सीटीस्कॅन, एमआरआय या तपासण्या करून रोहिणीमधील रक्‍तप्रवाहाची स्थिती पाहणं. तसंच निलेमधील निर्बंध, व्हेरिकोव्हेन्स, हे रोगनिदान करणं महत्त्वाचं असतं. जखमेत पू झाल्यास शस्त्रक्रिया करून पू काढून आणि संसर्ग झालेल्या पेशी काढून टाकाव्या लागतात. तरीही जंतुसंसर्ग पसरू लागला तर उरलेला पाय वाचविण्यासाठी खराब झालेला पायाचा भाग कापून टाकावा लागतो. कधी कधी हा संसर्ग रक्‍तामधून पसरून जीवघेणा होऊ नये, यासाठीसुद्धा पाय कापून टाकावा लागतो. याशिवाय जंतुसंसर्गावर प्रभावशील योग्य अशी प्रतिजैविकं (अँटीबायोटिक्‍स) द्यावी लागतात.

हे सारे टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय करणं उत्तम. मधुमेहींनी रक्‍तातील सारखरेचे प्रमाण योग्य ते राहील असं पाहवं. पायाची स्वच्छता राखून वेळोवेळी पायाचं निरीक्षण करावं. अनवाणी पायांनी फिरू नये. त्यायोगे जखमा टाळता येतील. वेळोवेळी नखं काळजीपूर्वक काढून पायांची बोटं आणि बोटांमधील जागा स्वच्छ ठेवावीत. तळव्याला संवेदना नसल्यास मधुमेहींसाठी असणारी खास पादत्राणं घालावीत. या पादत्राणात शरीराचे पायावर पडणाऱ्या वजनामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्याची वेगवेगळी तंत्र वापरली जातात. यासाठी वेळोवेळी पोडोयाट्रिस्ट या तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने पादत्राणात योग्य ते बदल करावेत. आहार नियंत्रण औषधांच्या योग्य उपचाराने रक्‍तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवल्यास मधुमेहींना पायाचे आजार टाळता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)