रक्षाबंधन विशेषः राशीनुसार अशी बांधा भावाला राखी

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला सण म्हणजे राखीपौर्णिमा होय. या सणाला शास्त्राची जोड देऊन तो खास पद्धतीने साजरा करुया. तुम्हाला तुमच्या लाडक्‍या भावाची रास माहितीच असेल, मग काही विचार न करता त्याला राशीनुसार अशी बांधा राखी…

मेष

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर तुमच्या भावाची रास मेष असेल तर लाल रंगाची राखी बांधा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.

वृषभ

ज्यांची रास वृषभ आहे त्यांच्या बहिणींनी निळ्या रंगाची राखी बांधावी. चांदीची राखीही बांधू शकतात. पांढऱ्या रंगाचा रुमाल भेट द्या.

मिथुन

मिथुन राशी असलेले भावांसाठी हिरवा, निळा, गुलाबी, सोनेरी रंगाचा निवड योग्य असेल.

कर्क

कर्क राशीच्या भावांसाठी पांढरा, क्रीम, पिवळा, नारंगी रंगाची निवड शुभ ठरेल.

सिंह

सिंह राशीच्या भावांसाठी गुलाबी, नारंगी, सोनेरी, निळा-काळ्या रंगांनासोडून बाकी सर्व रंगाच्या राखीची निवड करू शकता.

कन्या

तुमच्या भावाची रास कन्या असेल तर पांढऱ्या रेशमी रंगाची किंवा हिरव्या रंगाची राखी बांधा. हळद व चंदन मिश्रित टिळा लावा. पांढऱ्या रंगाचा रुमाल भेट म्हणून द्या.

तूळ

तुमच्या भावाची रास तूळ असेल तर जांभळ्या रंगाची राखी बांधल्याने वर्षभर नकारात्मक प्रभावापासून भावाची रक्षा होईल. केशराचा टिळा लावावा.

वृश्‍चिक

या राशीच्या लोकांसाठी लाल रंगाची राखी शुभ राहील. क्रीम रंगाचा रुमाल भेट म्हणून द्यावा.

धनु

या राशीच्या पिवळ्या रंगाची राखी बांधावी. चंदनाची राखी जीवनातही सुगंध पसरवते. हळद व कुंकवाचा टिळा लावावा. लाल रंगाचा रुमाल भेट द्यावा.

मकर

गडद्द रंगाची कोणतही राखी या लोकांसाठी शुभ राहील. केशराचा टिळा लावावा.

कुंभ

जर तुमच्या भावाची रस कुंभ असेल तर रुद्राक्षापासून तयार केलेली राखी शुभ राहील. हळदीचा टिळा लावावा. आकाशी रंगाचा रुमाल भेट म्हणून द्यावा.

मीन

पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची राखी या लोकांसाठी शुभ राहील. हळदीचा टिळा लावावा. पांढऱ्या रंगाचा रुमाल भेट म्हणून द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)