रक्षाबंधनाची एक लाखांची ओवळणी केरळला दिली मदत

भिगवण- भिगवण येथील जैन स्थानकांमध्ये सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्षाबंधनावेळी भावांनी बहिनींना ओवाळणी म्हणून दिलेली सुमारे एक लाख रुपयांची ओवाळणी केरळमधील पूरपरिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या बांधवांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चातुर्मासानिमित्त आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमांमध्ये जैन बांधवानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. येथील जैन स्थानकांमध्ये चातुर्मास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपप्रवर्तिनी सन्मितीजी, मंगलप्रभाजी, सुजेताजी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी, अशोक रायसोनी, विजय बोगावत, महेंद्र बोगावत आदींच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी ओवाळणीमधून सुमारे एक लाख रुपयांची रक्कम जमा झाली. जमा झालेली रक्कम केरळमध्ये पूरस्थितीमध्ये अडचणीत असलेल्या बांधवांना प्रदान करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या वेळी रक्षाबंधन विषयी बोलताना साध्वी सन्मतीजी म्हणाल्या की, सध्या समाज जात, धर्म, यामध्ये विभागला जात आहे. रक्षाबंधन हा सण सर्व समाजाला एकत्र आणणारा सण आहे. जात, धर्म बाजूला ठेवून विरोधी प्रवृत्तीच्या व्यक्तीला राखी बांधून त्याला समाजाच्या रक्षणासाठी प्रवृत्त केल्याची अनेक उदाहरणे इतिहास व अध्यात्मामध्ये आहेत. सध्या, केरळमधील बांधव हे पूरस्थितीमध्ये अडचणीत आहेत, त्यांना मदत करणे हेच खरे रक्षाबंधन होईल. कार्यक्रमाचे आयोजन सचिन बोगावत, संजय रायसोनी, निखिल बोगावत, उमाकांत रायसोनी, राहुल गुंदेचा, चेतन बोरा, संतोष गांधी, योगेश ललवाणी आदींनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)