रक्तदान करा; खरेखुरे हिरो बना!!! (भाग दोन)

   रक्तदान करण्यापूर्वी काय तयारी करावी लागते?

रक्तदानापूर्वी रक्तदाता उपाशी असू नये. रक्तदानापूर्वी 1 ते 3 तासात एखादे फळ किंवा चरबीविरहीत नाश्‍ता घेतलेला असावा.रक्तदानापूर्वी काही दिवस इच्छुक रक्तदात्याने आहारात मांसाहारी पदार्थ (चिकन, मासे), बिन्स, टोफू,पालेभाज्या अशा लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा, पुरेशी विश्रांती घ्यावी, रक्तदानाविषयी सर्व माहिती करून घेऊन रक्तदानावेळीचा ताणतणाव टाळावा.एकावेळी किती रक्ताचे दान करता येते?

एका रक्तदानात शरीरातील एकूण रक्ताच्या केवळ 10% म्हणजेच 350 – 500 मि.ली. रक्त देता येते. संपूर्ण रक्ताचे दान ((Whole blood donation) दर 3 महिन्यांनी करता येते, प्लेटलेट्‌स दर 7 दिवसांनी दान करता येतात (वर्षातून जास्तीत जास्त 24 वेळा), लाल रक्तपेशी दर 56 दिवसांनी देता येतात, ठइउ दर 112 दिवसांनी करता येते. रक्तातील द्रवभाग रक्तदानानंतर 24 तासांत भरून निघतो तर हिमोग्लोबिन भरून काढायला साधारण 4 ते 6 आठवडे लागतात.

 मासिक पाळी सुरू असताना रक्तदान करू शकतात का?

मासिक पाळीदरम्यान गर्भाशयाचे अस्तर बाहेर पडून थोडा रक्तस्त्राव होतो. त्याचा आपल्या शरीरातील वाहत्या रक्ताशी संबंध नाही. त्यामुळे मासिक पाळी सुरू असताना देखील महिला निश्‍चिंतपणे रक्तदान करू शकतात. रक्तदान केले तर पाळी लांबते हा गैरसमज आहे.

गोंदल्यानंतर (टॅटू केल्यानंतर) रक्तदान करता येते का?

मान्यताप्राप्त आणि प्रमाणित ठिकाणहून टॅटू काढून घेतल्यास व स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतल्यास (निर्जंतुक सुया आणि पुनर्वापर न केले जाणारे रंग वापरून) रक्तदान करता येते. भारतीय मार्गदर्शक तत्वांनुसार टॅटू केल्यानंतर रक्तदानासाठी 6 महिने थांबणे आवश्‍यक आहे. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण न केल्यास एच.आय.व्ही., काविळ (ब आणि क प्रकारची) होण्याची शक्‍यता असते आणि अशी व्यक्ती रक्तदानास अपात्र ठरते.

रक्तदानाचे काही दुष्परिणाम आहेत का?

सर्वसाधारणपणे रक्तदानाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. काही व्यक्तींना चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, डोके दुखणे, मळमळणे असा तात्पुरता त्रास होऊ शकतो. हा त्रास जास्तीत जास्त 72 तास टिकतो (रक्ताचा द्रवभाग भरून निघताच कमी होतो). रक्तदानावेळी खूप घाबरणे, ताण घेणे, काळजी करणे, घाबरणे यामुळे त्रासाची तीव्रता वाढू शकते.

 रक्तदान केलेल्या रक्ताच्या कोणकोणत्या तपासण्या करतात?

भारतात बहुतांशी रक्तदान ऐच्छिक रक्तदात्यांकडून होत असल्याने रक्तदानामार्फत होणाऱ्या आजारांचे ढीरपीर्षीीळेप ढीरपीाळीींशव खपषशलींळेपी -ढढख) प्रमाण कमी आहे. रक्तदानानंतर रक्ताची सखोल तपासणी करणे बंधनकारक आहे. यावेळी एच.आय.व्ही., काविळ (ब आणि क प्रकारची), सिफिलिस आणि मलेरिया यांच्या तपासण्या होतात. त्यामुळे असे आजार असणाऱ्यांनी रक्तदानापूर्वीच त्यांची माहिती दिली पाहिजे.

 रक्तदान करताना काय काळजी घ्यावी?

रक्तदान करताना शांत राहणे, दीर्घ श्‍वासोश्‍वास करणे, संगीत ऐकणे, कोणाशी बोलणे, मनातल्या मनात 1 ते 100 आकडे उलट-सुलट मोजणे यामुळे वेदना आणि अस्वस्थता कमी होईल. रक्तदान करताना सैलसर कपडे घालावे. शक्‍यतो बिनबाह्यांचे / आखूड बाह्यांचे कपडे घालावे जेणेकरून रक्त घेण्यास सोपे पडेल. कोणत्या हातावर रक्त घेणे सोयिस्कर आहे, पूर्वी रक्तदान केले असल्यास कोणत्या हातामधून यशस्विरीत्या रक्त घेतले गेले होते हे देखील रक्त घेणाऱ्यास सांगावे.

 रक्तदान केल्यानंतर काय काळजी घ्यावी?

रक्तदान करून जरी शरीरावर फार ताण येत नसला, तरी रक्तदानानंतर रक्तदात्याने काही मिनिटे विश्रांती घ्यावी, थोडे खाऊन घ्यावे. ज्या पदार्थांमध्ये प्रथिने आहेत असे पदार्थ (पनीर, चीज, टोफू, दही, बिन्स) आणि फळांचा रस घेणे सर्वात उत्तम! रक्तदानानंतर रक्तदाता आपले नेहमीचे काम करू शकतो, सुट्टी घ्यायची गरज नाही! जर रक्तदानानंतर चक्कर, डोकेदुखी असा त्रास झाला, तर बरे वाटेपर्यंत जरा वेळ शांत बसावे / पडून राहावे आणि दिवसभर विश्रांती घ्यावी.

रक्तदानानंतर 24 तासांसाठी आहारातील द्रवपदार्थांचे प्रमाण साधारण 1 लिटरने वाढवावे. मात्र, 8 तास मद्यपान कटाक्षाने टाळावे. रक्तदानानंतर काही व्यक्तींना कष्टाचे / शरीरश्रमाचे काम / व्यायाम केल्यास थकवा येऊ शकतो. त्यामुळे 2 तास असे करणे टाळावे. रक्त काढलेल्या जागी लावलेली पट्टी (बॅंडेज) निदान 4 ते 5 तास ठेवावी. त्याठिकाणहून रक्तस्त्राव झाला तर ती जागा 5 मिनिटे / रक्त थांबेपर्यंत दाबून धरावी, हात हृदयाच्या पातळीपासून वर धरावा. रक्तस्त्राव थांबला नाही, सूज आली तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डॉ. मानसी पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
4 :heart:
4 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)