योजनांचा प्राधान्यक्रम निश्‍चीत करा…

निमलष्करी दलांना गृहमंत्रालयाची सुचना
नवी दिल्ली – निमलष्करी दलांनी गृहमंत्रालयाकडे निधीची मागणी करताना अवास्तव अर्थसंकल्पीय अंदाज वर्तवला आहे. तथापी या निधीचा योग्य तो विनीयोग निमलष्करी दलांकडून होत नाही त्यामुळे आपल्याकडील गरजा आणि योजनांचा प्राधान्य क्रम निश्‍चीत करा आणि उपलब्ध निधीचा कालबद्ध वापर करा अशी सुचना गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांना केली आहे.

या संबंधात एक परिपत्रक गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांच्या मुख्यालयाला पाठवले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की बजेट एस्टीमेट आणि रिवाईज एस्टीमेट हे अवास्तव असल्याचे सार्वजनिक लेखा समितीच्या निदर्शनाला आले आहे. तसेच लेखा परिक्षणातहीं निमलष्करी दलांनी केलेल्या निधीच्या मागणीचा अवास्तवपणा लक्षात आला आहे. त्यामुळे अनेक वेळा मंजुर निधी पडून राहतो. तो राहु नये यासाठी निमलष्करी दलांनी आपल्या योजनांचा प्राधान्यक्रम निश्‍चीत करावा आणि त्यानुसार बजेट एस्टीमेट सादर करावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंजुर निधी निर्धारीत कालावधीत खर्ची पडेल याकडे लक्ष द्यावे अशी सूचना या परिपत्रकात करण्यात आली आहे. योजनांमध्ये कपात करून अनावश्‍यक खर्चही टाळण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. योजनांचीही अगदी काटेकोर नियोजन केले जावे आणि जरूर असेल तेवढाच निधी त्यांनी मागावा असेही त्यांना सुचवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)