ये अंदर कि बात है…

मध्ये एक गोष्ट वाचण्यात आली होती . अगदी शाहरुख खानही ‘रा वन’ च्या रिलीज नंतर डिप्रेशन मध्ये होता. दीपिकाने तर ते जाहीरपणे कबूल केलं अन त्याचा उपायही केला. आपल्या सर्वांना थोड्या फार फरकाने अशा गोष्टींचा सामना करण्याची वेळ येते.

मनाचं हे वागणं अगदी नैसर्गिक आहे. धावणं हा त्याचा धर्म आहे.. हे आपल्या सगळ्यांसोबत घडतं अन ‘जिंदगी बोहोत लंबी कहाणी है’ त्यामुळे पुढे मागे थोडं थोडं असं होत राहील पण.
यावर उत्तर इतकंच कि भक्तिभावाने एखाद्या कलेशी ,छंदाशी ,ध्यानाशी जीवन अर्पित असेल, स्थिर अन आनंदी राहता येत असेल तर हे सगळं भेदून जाणं आपल्याला सोपं जाईल. passionately आयुष्य जगताना, वेगवेगळ्या गोष्टी करताना आपण त्याची मजा घेऊ शकू.. जे आहे जसं आहे तसंच आयुष्य आपण चवीने जगू शकू.
पाहायला गेलं तर एक पान टपरी वाला सुद्धा एक अत्यंत स्थिर व आनंदी आयुष्य जगतो..  आपलं आयुष्य व्यवस्थित manage करणारा तो एक महान माणूस च असतो की.. आपले आपले प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत.. आपला आपला प्रवास प्रत्येकाला आहे..  पण यातली एक गंमत ती ही कि हा सगळा प्रवास आपण मजा घेत करत असताना रोज उगवणारा दिवस सर्वांसाठी समान आहे.. प्रॉब्लेम्स आहेत हे खरं आहे.. पण मनातल्या भक्तिभावाने खुश राहून स्थिर राहून मजा घेत काम केलं , आपल्याच ताटात स्थिर राहून काम केलं तर ताणतणाव जन्म घेणार नाही. दुसऱ्याच्या ताटात पाहिलं तर मात्र तणाव येईल हे नक्की..  ताट किती मोठं वा छोटं आहे यापेक्षाही महत्त्वाचं काळजातला आनंद आहे.. अन असं खुश राहून जीवनाची प्रेरणा जपत प्रगतीची धडपड करण्यातही मजा आहे.. आपल्याच ताटात पाहिलं तर प्रत्येकाचा प्रवास स्वर्गसुखाचा अनुभव आहे. हि दुनिया अशाच सुंदर प्रवाशांच्या सुंदर जीवनाचा भावानुभव आहे. हृदयाने स्थिर आनंदी राहिलं तर everything is perfect.. धावलो , धावत राहिलो logics लावले तर नजरेला स्वतःचं आयुष्य perfect वाटणार नाहीच.. त्यामुळे हा स्वर्गसुखाचा आनंद अन मजा हृदयातल्या स्थिर भावनेत आहे.
उत्साही माणसं मला खूप आवडतात. त्यांना  Problems नसतात असं अजिबात नाही पण जे आहे ते हसत हसत accept करून त्याची मजा घ्यायची धमक त्यांच्यामध्ये असते म्हणून!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणता तरी खास दिवस उगवावा असं वाटतं  आपल्याला..  स्टेशन गाठायची गडबड फार करतं मन..जो हवा आहे जसा हवा आहे तसा दिवस  उगवेल जरूर पण जो आज उगवलाय त्याची मजा मात्र घेतलीच पाहिजे. हा प्रवास njoy केला पाहिजे.. motivated ly काम करत राहिलं पाहिजे
आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्याची घाई कधी कधी इतकी होते की कशातच मन लागत नाही होते .पण हे नक्कीच  जास्त खरं कि त्या प्रवासाची खूप मजा असते .. आता ठरलंय म्हटल्यावर गाडी स्टेशन ला पोहोचणार हे नक्कीच पण जर आहे त्या परिस्थितीत मजा करत गेलो तर प्रवास memorable असेल. घाई गडबड करणाऱ्या मनाला जरा आहे तिथली मजा घ्यायला शिकवलं, स्टेशन चं भान ठेवून प्रवास साजरा करायला शिकवलं तर नक्कीच ध्यानात येईल, हर दिन अंदर कि बात है ..!!
कदाचित आयुष्यात हवं तसं सगळं उभं नाही राहात पण हृदयात मनात हवं तसं सारं असू शकतं..
एक गोष्ट मी प्रचंड मानतो.. मला आवडतं तसा विचार करायला.. कि’ perfect conditions does not exist outside, they exist in our peaceful n happy hearts..’

भटकणं हा मनाचा स्थायीभाव आहे.. त्याच्याशी आपली शांतसुंदर मैत्री असणं हे आपलं काम आहे.. दिवसभराच्या कामात कदाचित आपल्याला जास्त performance oriented राहणं जास्त गरजेचं अन महत्त्वाचं आहे.. तिथे या सुकून peace आणि वगैरे गोष्टींना घेऊन बसलो तर आपण कदाचित कामच करणार नाही..
दिवसभरात execution, performance, पूर्वतयारी , जबाबदारी या साऱ्याला खूप महत्त्व आहे आणि नक्कीच आहे. तिथे भावनांवर छानसं नियंत्रण असायलाच हवं .. आणि रोज १०-१२ तास  काम करण्याची self comittment असायला हवी.. हि comittment जेव्हा स्वतःशी असते.. आपल्यालाच ते करायचं असतं तेव्हा त्या कामाची आपली उरक नक्कीच उत्साही असते किंबहुना आपण उत्साहाने ते करायला हवं.
असं म्हणतात ना कि,’ no matter how the day appears like, get up dress up n show up’  – be happy have fun n deliver high performance..
या उर्जेमध्ये मजा आहे.. खूप मजा आहे.. कदाचित नाईलाजास्तव काम आवडीचं नसेल तरी ते पूर्ण करण्यात मजा आहे..

दिवसाला अर्थ येतो तो मनातल्या भावनांनी..
मन हसतं खेळतं उत्साही स्थिर शांत उर्जावंत ठेवायला ध्यान नक्कीच मदत करतं..
लक्षपूर्वक निश्चयाने आनंदाने एखाद्या गोष्टीत बुडता येणं म्हणजे ध्यान..
मग ते कदाचित गाणं असू शकतं, वाचणं लिहिणं बोलणं अन कित्येक गोष्टी.. मनाला स्थिर शांत खुश करणारा एक तरी छंद प्रत्येकाला असला पाहिजे..
जीवनाचा समुद्र तरून जायला एक तर बेधडकपणे पोहून जायला हवं किंवा जे आहे त्यात खुश होऊन मनापासून बुडता तरी यायला हवं..
गुलजार साहेब एकदा नदीकिनारी थांबले असताना त्यांना प्रश्न विचारला गेला की ‘क्या आपको तैरना आता है’ , तेव्हा अगदी मागे वळून सुद्धा ना पाहता गुलजार साहेब बोलून गेले,” नही, पर डूबना आता है”.
So असं काहीतरी नक्की हवं ज्यात आपण आनंदाने ऊर्जेने बुडून जातो. खुश होतो.जग विसरून जातो. अन नियमितपणे स्वतःच्या आनंदासाठी त्यात बुडण्याची जबाबदारी आपली स्वतःची. दिवसभराचं काम खूप महत्त्वाचं आहे.. मात्र ते मोकळ्या डोक्याने करण्यासाठी वैयक्तिक छंद हवेत ज्यामुळे दिवसाला हसतखेळत भिडू शकतो आपण.. मन मोकळं करू शकतो आपण.
त्या आपल्या वैयक्तिक अशा स्वच्छ शांत अशा वैयक्तीक जगात दुनियेला फालतू विचारांना एन्ट्री नाही ही धमक आपण नियमितपणे दाखवली पाहिजे.. ज्याला बेधडक बिनधास्त हसत खेळत जगायचंय त्याच्यासाठी असं ध्यान नक्कीच महत्त्वाचं आहे..
दुनिया, जिंदगी हमारे इशारो पे नही चलती. और वो जरुरी है भी नही.. जरुरी तो ये है कि दिल मैं क्या चल रहा है.. और ख़ुशी कि बात ये है कि ये दिल अपने इशारो पे  चलना possible है . जे मनात चाललेलं असतं तेच जगात दिसतं. तसंच feel होतं. अगदीच खरी बात आहे , ‘यथा दृष्टी तथा सृष्टी’!

ध्यान ज्याला म्हणतात ते हेच कि मनाने स्थिर व आनंदी राहत कार्य करणं ..लढण्यासाठी हवी तितकी ऊर्जा ध्यान देतं. निश्चयाचं बळ ध्यान देतं.. आपल्या साऱ्या विचारांपेक्षा अधिक सुंदर ,खूप सुंदर निर्मळ उत्साही अन उर्जावंत आहे ध्यान. त्यामुळे आपल्या चिंता करायला लावणाऱ्या विचारांपेक्षा आपण साऱ्यांनी रोज थोडंसं ध्यानाच्या नादी लागायला नक्कीच हरकत नाही.
हा दिवस तितका सुंदर असतो आणि आहेच. प्रत्येकच दिवस . आपल्याला खूप सुंदर करणारा साक्षात भगवंत स्वरूप असा हा दिवस.. आपण मात्र आपल्या डोक्यातल्या विचारांनी  त्यातली मजा काढून घेतो.
स्वतःमधून बाहेर पडून त्याची भेट आपण उत्साहाने घेतली पाहिजे.. हे मर्म अनुभवण्याची माध्यमं खूप आहेत.. 12 तासांची self comittment ठेऊन केलेलं काम-work ethic, अन मग  लिहिणं ,गाणं, वाचणं ,बोलणं, फिरणं, हसून खेळून रिलॅक्स राहणं,  अन कितीतरी गोष्टी.. पण स्वतःमध्येच अडकून पडल्यावर ‘गुमराह तो है जो घर से निकले हि नही हि भावना’ आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.. अन यातून बाहेर पडण्याची धमक आज आपण स्वतः दाखवणं , दाखवत राहणं अन जीवनाची मजा घेणं महत्त्वाचं!!!!!!! खरंच..”ये अंदर कि बात है”

असं म्हणत अटलजींच्या ओळींनी शेवट करतो !!

“जब मन में हो मौज बहारों की
चमकाएँ चमक सितारों की,
जब ख़ुशियों के शुभ घेरे हों
तन्हाई में भी मेले हों,
आनंद की आभा होती है
उस रोज़ ‘दिवाली’ होती है ।”

– ऋषिकेश कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)