येलघोल जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे!

पवनानगर – मावळ तालुक्‍यातील दुर्गम भागातील येलघोल गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीपासून ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांना तीनच शिक्षक शिकवण्यासाठी असल्याने शाळेला ग्रामस्थांकडून वर्गाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले आहे.

येलघोल येथील शाळेमध्ये सहा शिक्षकांची गरज असून गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या ऑनलाईन बदल्यामुळे या ठिकाणी फक्‍त तीनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या शिक्षकामध्ये एकही पदवीधर शिक्षक नसल्याने अनेक वेळा येलघोल ग्रामस्थांनी वेळोवेळी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती मावळ यांच्याकडे तक्रार दिल्या, मात्र या शाळेला शिक्षक न मिळाल्याने अखेर बुधवारी गावातील ग्रामस्थांनी मुलांना सुट्टी देऊन शाळेला टाळे ठोकून आंदोलन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषद शाळा येलघोल येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत 127 विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे केवळ तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. येथील शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येलघोल ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी पुणे व तालुका स्थरावर अनेकादा वारंवार तक्रार देऊन सुद्धा याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने येलघोल ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 25) सकाळी अकरा वाजता वर्गातील मुलांना बाहेर काढून टाळे ठोकले.

त्यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, सोमवारपर्यंत जर पदवीधर शिक्षक उपलब्ध झाले नाही, तर आम्ही आमच्या मुलांना घेऊन वडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयापुढे आंदोलन करणार आहे. तो पर्यंत शाळा चालू केली जाणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी येलघोल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पु घारे, विकास घारे, काशिनाथ घारे, नरहरी वाजे, अविनाश मालपोटे, पोपट भिलारे, अनिल भरणे, संभाजी घारे, ऋषीकेश भिलारे, पिंटु कोकरे, गजानन घारे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)