येत्या ४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडू आणि बंगाल उपसागरात

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाचे रविवारी अरबी समुद्राच्या कोमारीन भाग, मालदीव बेट, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान, निकोबार बेट, अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. ४८ तासांत मान्सून दक्षिण केरळ, तामिळनाडु व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल हवामान असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

२४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २९ मे ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. ३० व ३१ मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)