येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावर

मुंबई: देशातील पहिली वहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3च्या 33.5 किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोन याठिकाणी झाले. यावेळी, कोस्टल रोड,सी लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या 3 वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई मेट्रो 3 पॅकेज 7 मधील 1.26 किमी इतके भुयारीकरण आज पूर्ण झाले. या भुयारीकरणाच्या कामाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडविण्यासाठी राज्य शासनाने मेट्रो चे विस्तृत जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील मेट्रो 3 या महत्त्वाच्या मार्गिकेतील पहिल्या भुयारी टप्प्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होताना मला विशेष आनंद होत आहे. ही चांगली सुरूवात असून आणखी खूप मोठे काम करायचे आहे. मेट्रो ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरक्षित, आरामदायी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार असून भुयारी मेट्रोला एलिव्हेटेड मेट्रोने जोडल्यानंतर सार्वजिक वाहतुकीचे इंटिग्रेशन होऊन नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)