पुणे -आज-काल नोकऱ्यांची स्थिती सतत बदलत आहे. आता असलेली संधी ही पुढच्या 5 ते 10 वर्षांत निघून गेलेली असते. सततच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी समाधानासोबतच आयुष्यात पुढे जाण्याकरिता यशस्वी करियरची इच्छा बाळगतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या करियर यशाला नवा आयाम मिळावा म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स (यूएनएसडब्ल्यू), सिडनी यांनी सु-संशोधित आणि अतिशय यशस्वी असा प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (पीडीपी) तयार केला.
युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स (युएनएसडब्ल्यू), सिडनी, ऑस्ट्रेलिया, क्यूएस अनुसार 45व्या क्रमांकावर आहे आणि युएनएसडब्ल्यू सिडनीचा एम्प्लॉयर रेप्युटेशन क्रमांक 26 आहे, त्याचा भर केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवर असून विद्यार्थी रोजगारावर आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नव्या क्षेत्रातील कौशल्यात वाढ होऊनही त्यांना उत्पादक रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा