युवतीच्या अपहरणप्रकरणी दोघांना बेड्या

वाकी- सतरा वर्षांच्या युवतीला खोटे आमिष दाखवून फूस लावून तिचे दुचाकीवरून अपहरणकेल्याप्रकरणी चाकण येथील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. ऋतिक राजेंद्र शेलार (वय 18) व कृष्णा गुरुबा झाडे (दोघेही रा. चाकण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, ऋतिक शेलारने सबंधित युवतीला कशाचे तरी खोटे आमिष दाखवून फूस लावून तीच्या आई-वडिलांच्या समोरून दुचाकीवरून पळवून नेले होते, असे पीडितेने फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)