युवक कॉंग्रेस कडून बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नगर  – बारावीच्या निकालाच्या निमित्ताने युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉंग्रेस च्या वतीने नागापूर , एम आय डी सी ,बोल्हेगाव परिसरातील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थीचा अभिनंदन व सत्कार नगर शहर युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयुर पाटोळे व युवा उद्योजक सुजय शेट गांधी यांनी केले व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी अनेक विद्यार्थी, परिसरातील पालक , व जेष्ठ नागरिक उपस्थीत होते.
मयुर पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या , व जे विद्यार्थी नापास झाले त्यांनी निराश न होता पुन्हा परीक्षा द्यावी व मिळणाऱ्या एक वर्षाच्या काळात ज्यांना काही तरी शिकून उद्योग व्यवसाय करावयाची इच्छा असेल त्यांना युवक कॉंग्रेस च्या वतीने सहकार्य केले जाईल
यावेळी विध्यार्थी- उमेश रासकर, शोएब शेख, कपिलेश विघे, प्रमोद गरजे, निलेश पाठक, तुषार झिणे, अथर्व होणं, सिद्धी रेपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी जेष्ठ नागरिक- सुजय गांधी , रामदास काळे यांच्यासह सुनिता खांदवे , अंजली ओढणे, मीरा रोमन व युवक वर्ग आदी उपस्थीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)