युवकाचा खून आठ महिन्यांनंतर उघडकी

मांजरवाडी येथील घटना : मुख्य आरोपीसह तिघे जेरबंद

नारायणगाव- अनैतिक संबंध असल्याचा संशय तसेच मित्राची बदनामी करतो आणि घराची बदनामी केली म्हणून मित्राच्या साह्याने मांजरवाडी येथील 32 वर्षांच्या युवकाचा आठ महिन्यांपूर्वी खून केला होता. त्याप्रकरणातील मुख्य आरोपी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिली. तर नारायणगाव पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
विकास उर्फ विक्रम किसन खंडागळे (वय 32, रा. खंडागळेमळा, मांजरवाडी, ता. जुन्नर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दीपक अशोक गोरडे (रा. लोंढेमळा, एकलहरे, ता. आंबेगाव), प्रमोद करंजखले (रा. मांजरवाडी, ता. जुन्नर), अमोल गांजवे, दीपक सुरावर (रा. लोंढे मळा, कळंब, ता. आंबेगाव) या युवकाच्या खूनप्रकरणी आज (रविवारी) गुन्हा दाखल केला असून या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अनिल छबुराव मोरे नारायणगाव पोलीस ठाणे यांनी दिली आहे.
पद्माकर घनवट व अर्जुन घोड म्हणाले की, 10 एप्रिल 2018 ला सकाळी साडेअकराच्या सुमारास मांजरवाडी गावचे हद्दीत मराठी शाळेपासूनचे एका शेतात विकास किसन खंडागळे यांचा मृतदेह मिळुन आला होता. त्यावेळी दिलेल्या तक्रारीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास हा नारायणगाव पोलीस ठाण्याचे वतीने सुरू होता. तर शनिवारी (दि. 26) पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळालेल्या माहितीनुसार मयत विकास किसन खंडागळे याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून दीपकने त्याचा खून केला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यत्स ताब्यात घेऊन नारायणगाव पोलिसांच्या ठाण्याकडे पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.
नारायणगाव पोलिसांनी आरोपी दीपक अशोक गोरडे यांच्या सह प्रमोद करंजखले, अमोल गांजवे या तिघांना अटक केली आहे .हा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, हवालदार दत्तात्रय जगताप, पोलीस नाईक दीपक साबळे, शंकर जम, सुनिल जावळे, शरद बांबळे, सी. बी. बागेवाडी, अक्षय जावळे व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे, उपनिरीक्षक अनिल मोरे आदींच्या पथकाने उघडकीस आणला आहे.

  • संशयाने घेतला बळी
    मृत विकास खंडागळे यास दारू पिण्याचे व्यसन होते. त्या व्यसनामुळे तसेच पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेवून त्याबाबत गावात चर्चा करून घराची, मित्रांची बदनामी करतो, तसेच पत्नी व आईस नेमारहाण करीत असल्याने त्या कारणावरून चिडून जावुन दीपकने मित्राच्या मदतीने खून केल्याची माहिती समजली. या माहितीची खात्री करून दीपकला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने मित्राच्या मदतीने विकास खंडागळे याला पट्ट्याने व लाकडी काठीने मारहाण करून खून केला. त्यानंतर त्यास मोटारसायकल वरून त्याच्या घरी आणुन सोडले असे कबुल केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)