युपीच्या मुख्यमंत्र्यांवर सिनेमा “जिला गोरखपूर’ 

एकापाठोपाठ-एक बायोपिक रिलीज होत असताना राजकारणाचे क्षेत्र त्यापासून दुर्लक्षित कसे राहू शकेल. उत्तर प्रदेशात कट्टर हिंदुत्ववाद्यांवर आणि “मॉब लिंचिंग’च्या घटनांवर आधारित एक सिनेमा येतो आहे. “जिला गोरखपूर’ असे त्याचे नाव आहे. विषयाच्या केंद्रस्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची व्यक्तिरेखा असणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.
पोस्टरमध्येच योगी आदित्यनाथ यांची पाठमोरी छबी आणि गोरखपूरमधील काही मंदिरांची झलक बघायला मिळते आहे. योगी आदित्यनाथ यांचा जन्म जरी उत्तराखंडमधील असला, तरी त्यांची राजकीय कारकिर्द गोरखपूरशी संबंधित आहे. पूर्वाश्रमीचे अजय सिंह बिष्ट यांनी 26 व्या वर्षीच सन्यास घेतला आणि आदित्यनाथ हे नाव धारण केले. नॉस्ट्रम एन्टरटेनमेंटद्वारे या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. हा सिनेमा योगी आदित्यनाथ यांच्यावरच आधारलेला आहे, असे निर्माता विनोद तिवारीने सांगितले.
मात्र योगी आदित्यनाथ यांची भूमिका कोण साकारणार याबाबत मात्र विनोद तिवारींनी मौन बाळगले आहे. या पोस्टरमधील आदित्यनाथ पाठमोरे आहेत आणि त्यांच्या हातात बंदुकही दिसते आहे. याचाच अर्थ “भगवा दहशतवाद’ असाच सिनेमाचा विषय असल्याचे सांगितले जाऊ शकते. उत्तर प्रदेशातील राजकारण किती संवेदनशील असू शकते, याचे प्रत्यंतर या सिनेमाच्या रिलीजनंतर येऊ शकेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)