या वर्षी ऑस्ट्रेलियात शतकातील सर्वात भीषण दुष्काळ 

File photo
सिडनी: ऑस्ट्रेलिया सध्या शतकातील सर्वात भीषण दुष्काळाला तोंड देत आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये दुष्क़ाळामुळे जमिनीत ओलाव्याचा अंशही राहिलेला नाही. जमिनीवर गवतही शिल्लक राहिलेले नाही. पशु-पक्षी तहान आणि भुकेने मरण पावत आहेत. 57 टक्के भाग दुष्काळपीडित म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे हे सलग सातवे वर्ष आहे. अल निनो आणि गोबल वॉर्मिंग ही दुष्काळाची दोन प्रमुख कारणे आहेत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सन 2003-2004 मध्येही असाच दुष्काळ पडला होता. त्याच्याही अगोदर सन 1920-21 मध्ये आणि सन 1901-02 मध्येही ऑस्ट्रलियात भीषण दुष्कळ पडला होता. ऑस्ट्रेलियात पावसाचे मोजमाप करणारी 7,000 केंद्रे आहेत. कोबरमध्ये या वर्षी सरासरीच्या 93.3 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 5.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)