‘या’ बोल्ड अभिनेत्रीसोबत अभिनय करणार सिनेमा

‘ती सध्या काय करते’ या सतिश राजवाडे दिग्दर्शित सिनेमातून अभिनय बेर्डेने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता अभिनयचा दुसरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनय सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही आशिकी’ या सिनेमांत काम करत आहे.

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मागीलवर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. ‘अशी ही आशिकी’ हे त्यांच्या नवीन चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभिनय बेर्डेला साइन केले आहे अशी माहिती दिली होती. यूथ लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाच्या घोषणेवेळी सचिन यांनी अभिनेत्रीच्या नावाचा उलगडा केला नव्हता. पण आता त्यांना चित्रपटासाठी अभिनेत्री गवसली असून हेमल इंगळे हे तिचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिनय आणि हेमल या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हेमलचा हा पहिलाच चित्रपट असून अभिनयचा हा दुसरा चित्रपट असेल. अभिनयने सतिश राजवाडेंच्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. आता ‘अशी ही आशिकी’मधून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेते जयवंत वाडकर यांचीही एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज समोर आले आहेत. एका फोटोत सचिन पिळगावकर आणि जयवंत वाडकर एकत्र दिसत आहेत. तर आणखी एका फोटोत चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)