या धन वर्षावात भिजण्याची संधी केव्हा साधणार ?

“म्युच्युअल फंड सही है’ या मोहिमेद्वारे म्युच्युअल फंडाचा मोठा प्रचार झाल्यामुळे छोटे गुंतवणूकदार नेहमीच्या गुंतवणूक पर्यायांऐवजी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. म्युच्युअल फंडांकडे असणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी (रु. 23.1 लाख कोटी) छोट्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक प्रथमच 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. सदर आकडेवारी जुलै 2018 अखेरची आहे. ऑक्‍टोबर 2007 मध्ये म्युच्युअल फंडांकडे एकूण असणाऱ्या गुंतवणुकीचा आकडा रु. 5.6 लाख कोटींचा होता. त्यापैकी 2 लाख कोटी रुपये छोट्या गुंतवणूकदारांचे होते. छोट्या गुंतवणूकदाराच्या एकूण गुंतवणुकीचा पहिले एक लाख कोटी रुपये होण्यास सात वर्षांचा कालावधी लागला. परंतु, शेवटचे 9 लाख कोटींवरून 10 लाख कोटी होण्यास केवळ सात महिने लागले.


छोट्या गुंतवणूकदारांचा म्युच्युल फंडामधील गुंतवणुकीचा ओघ सातत्याने वाढत आहे. याचे परिवर्तन एकूण गुंतवणूक वाढण्यामध्ये तसेच एकूण गुंतवणुकदारांच्या संख्येतही वाढ होण्यामध्ये झाली आहे. जवळपास गुंतवणुकदारांची संख्या दुपटीने वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांमध्ये छोट्या गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवली आहे. मार्च 2016 मध्ये दरमहा रू. 2923 कोटींची गुंतवणूक एसआयपीमाध्यमातून होत होती. सदर गुंतवणुकीचा आकडा वाढून जुलै 2018 रोजी हाच आकडा रु. 7554 कोटींपर्यंत वाढला आहे.

जगभरात एकूण गुंतवणुकीचा प्रवाह पारंपरिक सोने, जमिन यांपासून म्युच्युअल फंड व शेअर्समध्ये परावर्तित होताना दिसत आहे. भारतातही श्रीमंत व अतिश्रीमंत यांच्या गुंतवणुकीत इक्विटी व म्युच्युअल फंड या प्रकारात सातत्याने वाढताना दिसत आहे.

आपण या धन वर्षावात भिजण्याची संधी कधी घेणार आहोत?

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)