‘या’ खास मैत्रिणीसाठी सोनमने लग्नाची तारीख पुढे ढकलली होती

बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्री एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी असू शकत नाही. सोनम आणि स्वरा भास्कर बॉलिवूडमधल्या सर्वात घट्ट मैत्रिणी आहेत. नुकतीच सोनम विवाहबंधनात अडकली. सोनम आणि आनंद अहुजाचा विवाहसोहळा जरी मे महिन्यात पार पडला असला तरी त्यांच्या लग्नासाठी १२ मार्च ही तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती. केवळ स्वरासाठी सोनमनं आपलं लग्न पुढे ढकललं, नुकतंच एका मुलाखतीत स्वरानं हे कबुल केलं आहे.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘रांझणा’ चित्रपटात दोघींनी एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासून या दोघींमधली मैत्री अद्यापही कायम आहे. सोनम आणि आनंद यांच्या लग्नाचा मुहूर्त १२ मार्च रोजी ठरला होता. पण, याचदिवशी स्वराचा भाऊ इशानचंही लग्न ठरलं. भावाच्या लग्नामुळे जवळच्या मैत्रीणींच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नाही याचं दु:ख स्वराला सलत होतं. स्वराची अडचण समजल्यावर लगेचच सोनमनं लग्नाची तारिख पुढे ढकलण्याची विनंती कुटुंबियांना केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)