‘या’ कारणाने मलायकाने ड्रायव्हरला हाकलले

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातल्या अफेअरच्या वेगवेगळ्या किश्‍शांनी फिल्मी मासिकांचे रकानेच्या रकाने भरायला लागले आहेत. गेल्या वर्षभरापासून या अफेअरची जेवढी चविष्ट चर्चा झाली, तेवढी अन्य कोणत्याही फिल्मी विषयाची झाली नसेल. हे दोघे कोठे भेटले, त्यांना कोणी कोणी विरोध केला, त्यांच्या अफेअरवर अरबाझ खानची काय प्रतिक्रिया होती वगैरे वगैरे… अशा कितीतरी गोष्टी वारंवार फिल्मी गॉसिपकट्टयावर खपायला लागल्या. पण आपल्याबाबत एवढ्या खासगी गोष्टी मिडीयावाल्यांपर्यंत पोहोचतातच कशा असा प्रश्‍न मलायकाला नक्कीच पडला असणार. म्हणूनच तिने एक मोठे पाऊल उचलले आहे.

आपण आणि अर्जुन कपूरबाबतचे पर्सनल माहिती उघड होते आहे, हे मलायकाच्या ध्यानात आले आणि तिने चक्क आपल्याच ड्रायव्हरची हकालपट्टी करून टाकली आहे. हा ड्रायव्हरच तिच्या आणि अर्जुन कपूरबाबतच्या बातम्या उघड करत असायचा, असा तिला दाट संशय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलायका आणि अरबाझ जेंव्हा पती पत्नी होते, तेंव्हा मुकेश आणि बबलू असे दोन ड्रायव्हर त्यांच्याकडे कामाला होते. मलायकासाठी मुकेश आणि अरबाझसाठी बबलू ड्रायव्हिंग करत असायचे. अरबाझ आणि मलायका विभक्‍त झाल्यानंतरही हे दोन्ही ड्रायव्हर त्यांच्याचसाठी काम करत असायचे. मात्र तरिही मलायकाला आपल्याबाबतच्या बातम्या “लीक’ होत आहेत, हे लक्षात यायला लागल्याने तिने आपल्या ड्रायव्हरला “गुड बाय’ केले.

आता मलायका आणि अर्जुनचे काय व्हायचे ते होईल, ते आता मिडीयावाल्यांपर्यंत सहजासहजी पोहोचणार नाही. पण अरबाझचे काय चालले आहे, ते मात्र समजू शकेल. अरबाझचे सध्या जॉर्जिया नावाच्या मॉडेलबरोबर अफेअर सुरू आहे. आता ही माहिती कशी समजली ते नका विचारु….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)