यापुढे बँकेच्या प्रत्येक सेवेसाठी मोजावे लागणार पैसे ?

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशातील बँका आपल्या ग्राहकांकडून यापुढे त्यांच्या प्रत्येक सेवेसाठी पैसे आकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानुसार एटीएम ट्रांजेक्शनदेखील फ्री राहणार नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच बँकेतून पैसे काढणे, भरणे, खात्यातील कमीत कमी रक्कम, चेकबुकचा वापर करणे यापुढे महागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशातील प्रमुख बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एक्सिस आणि कोटक महिंद्र बँकेला देशातील गुड्स एंड सर्विस टैक्स संचालनालयने नोटीस देत मागील पाच वर्षाचा कर भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संचालनालयच्या या कारवाईमुळे देशातील बँक सेवा महागणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हि नोटीस देशातील अन्य बँकांना येत्या काळात देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)