यापुढील आंदोलने शांततेच्या मार्गाने व्हावीत

मराठा क्रांती मोर्चा : आंदोलनात गुंड घुसल्याचा दावा
– आजपासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 31 – “आपला समाज हा शिवरायांचा मावळा आहे. तो विवेकी आहे. क्रांती मोर्चा आंदोलनात जाणून-बूजून गुंड घुसविले जात आहेत. त्यामुळे आपली प्रतिमा मलीन होत आहे. समाजाची एकात्मता व शांतता आम्हाला हवी आहे. त्यामुळे यापुढील आंदोलने ही शांततेच्या मार्गाने करण्यात यावीत,’ असे आवाहन मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्यावतीने मंगळवारी करण्यात आले. तर, 1 ऑगस्टपासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्यावतीने मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने आरक्षणाबाबत लेखी आश्‍वासन देणे आवश्‍यक आहे. यापूर्वी म्हणजे 9 ऑगस्ट 2017 रोजी मराठा क्रांती मोर्चातर्फे 20 विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सरकारला दिले आहे. त्यापैकी मंजूर मागण्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि उर्वरित मागण्याची पूर्तता सरकारने त्वरीत करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोघम आश्‍वासन ऐकण्यची मनस्थिती आता संपली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कालमर्यादा जाहीर करावी. सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती व वसतिगृह योजना कागदावर नेमून खेड्या-पाड्यातील मराठा तरुणांना न्याय मिळत नसतो. त्याच्या पोटातील भूक भागेल, अशी निश्‍चित उपाय-योजना सरकारने करावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)