यशवंत हॉस्पिटलचे दि.26 रोजी खा. शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन

सातारा – सातारा शहरातील अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त व सुसज्ज अशा यशवंत हॉस्पिटलचे उद्‌घाटन मा. खा. शरद पवार यांच्या हस्ते शनिवार, दि. 26 रोजी सकाळी 10.30 वा.होणार आहे. सातारा येथील बसाप्पा पेठ, करंजे तर्फ सातारा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य अशा यशवंत हॉस्प्टिल मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा शुभारंभ होणार आहे.

यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जि. प. अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, डॉ. व्ही. एन. श्रीखंडे प्रसिद्ध हिप्टोबिलिरी सर्जन डॉ. अनिल कारापुरकर प्रसिद्ध नुरो इंडोव्हॅस्कुलार सर्जन, मा. डॉ. सुशील पाटकर (प्रसिद्ध नुरोसर्जन) डॉ. रणजित जगताप प्रसिद्ध कार्डियाक सर्जन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरक्षेचे सर्व नियम व अटींची पूर्तता करून सुसज्ज असे हॉस्पिटल रूग्ण सेवेसाठी सातारामध्ये सुरू होत आसल्याची माहिती यावेळी डॉ. अनिल पाटील यांनी दिली. ते म्हणाले, साताऱ्यातील एकमेव ब्रॅड न्यु 1.5 टेस्ला एम.आर.आय. मशीन व ब्रॅण्ड न्यू मल्टी सी.टी. स्कॅन मशीनसहित सर्व डायग्नोस्टिक सुविधेसह 75 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व एन.ए.बी.एच मानांकनानुसार आवश्‍यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या व अत्याधुनिक उपकरणासहित सुसज्ज अशा चार वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटरचा समावेश या हॉस्पिटलमध्ये असणार आहे. यामध्ये लॅप्रोस्कोपिक थिएटर (स्त्री रोग दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांसाठी), आर्थोपेडिक्‍स थिएटर, (हाडांच्या व सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी) न्युरोसर्जरी थिएटर (मेंदू व मणक्‍यांच्या शस्त्रक्रिंयांसाठी) व इमर्जन्सी थिएटरची एकमेव सुविधा सातारा शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी ऍनास्थेशियालॉजिस्ट डॉ.शुभांगी पाटील, एम. सी. एच न्युरोसर्जन डॉ. अनिल पाटील यांनी या कार्यक्रमाला सातारावासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)