यशवंत सिन्हांनी सोडली भाजप…

पक्षीय राजकारणातून घेतला संन्यास


मोदींच्या विरोधात चालवणार लोकशाही बचाव मोहीम

पाटणा – बंडखोर भाजप नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज अखेर भाजप मधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला. आपण आता पक्षीय राजकारणापासून संन्यास घेत आहोत अशी घोषणा करतानाच त्यांनी देशात आपण लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रीय मोहीम हाती घेत असल्याची घोषणाही त्यांनी केली. मी आजपासून भाजपशी असलेले माझे सारे संबंध तोडत आहे अशा शब्दात त्यांनी भाजपशी फारकत घेतली आहे. पक्षाच्या आजच्या स्थितीमुळेच आपल्यावर ही वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की देशात काय चालले आहे हे तुम्ही पहातच आहात. अर्थ संकल्पीय अधिवेशनाचा उल्लेख करून ते म्हणाले की हे अधिवेशन आत्तापर्यंत सर्वात लवकर आटोपते घेण्यात आलेले अधिवेशन आहे. सर्व भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण आता कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही, आपल्याला आता कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, केवळ राष्ट्रहितासाठी आणि लोकशाही साठी पक्षविरहीत भावनेतून आपण कार्यरत राहणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यशवंत सिन्हा यांनी 90 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला होता. यशवंत सिन्हा यांनी अलिकडेच मोदींच्या विरोधात राष्ट्रीय मंच स्थापन केला असून त्यात कॉंग्रससह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली आहे. बिगर भाजप पक्षाच्या एकीकरणासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकतर्फी बहुमत मिळाल्यानंतर पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना दूरच ठेवले होते त्यात यशवंत सिन्हा यांचाही समावेश होता. तेव्हापासून त्यांची धूसफूस सुरू होती. पक्षात राहुनही त्यांनी मोदींच्या आर्थिक धोरणांना सातत्याने विरोध केला आहे. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे देश कसा रसातळाला जात आहे हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. 1998 ते 2004 या अवधीत ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)