यशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा

संग्रहित छायाचित्र....

उच्च न्यायालयाचा निर्यण : शासनाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

पुणे: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी कारखान्याची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठीच कारखाना अवानसायात काढण्यात आल्याचे आरोपांबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी नुकतीच झाली.त्यात न्यायालयाने यशवंतबाबत “जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा अंतिरम आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पांडुरंग काळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर झाली. सुनावणी अंती यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत “जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबत अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिला व शासनाला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. पुणे शहराच्या जवळ 248 एकर जमिनीची किंमत नाममात्र 2 कोटी 51 लाख रुपये एवढी असल्याचा शोध सहकार खात्याने लावला आहे. कारखान्याची जमीन खासगी उद्योगपतींच्या लाभात वर्ग करण्यासाठी कारस्थान रचण्यात आले व यशवंत सहकारी साखर कारखानाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याबाबत देखावा उभा करून कारखाना अवसायानात घेण्यात आला असा मुद्दा उपस्थित करून काळे यांनी कारखान्याची अवसायन प्रक्रियेस उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

कारखान्याची 40 एकर जमीन विकून कारखाना कर्जमुक्‍त करून चालविण्याचा प्रस्ताव नाकारणे, कारखाना अवसायानात घेण्याधीच दि. 2 नोव्हेंबर 2017 रोजी माजी सहकारमंत्र्यांनी कारखाना तातडीने भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्याचा निर्णय घेणे, महाराष्ट्र शासनाच्या मिटकॉन कन्सल्टंन्सी आणि इंजीनियरिंग सर्विसिस लिमिटेड, पुणे यांनी प्राप्त परिस्थितीमध्ये अजून 52 कोटी रुपये कर्ज मिळवून देता येईल. या सुचनेकडे दुर्लक्ष करणे, शेतकरी सभासदांच्या हरकतींचा विचार न करणे, पुणे शहराच्या जवळ 248 एकर जमिनीची किंमत नाममात्र 2 कोटी 51 लाख रुपये एवढी असल्याचा दस्त ऐवज तयार करणे या बाबींमुळे कारखानाची अवसायन प्रक्रिया एक कारस्थान असून या प्रकरणात भ्रष्टाचाराची सर्व लक्षणे दिसून येत आहेत, असे ही काळे यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी थेऊर येथील पांडुरंग काळे यांच्या वतीने ऍड. अभिजीत कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

कारभार गुंडाळ्यांचे मूर्तीमंत उदाहरण

हवेली, खेड, दौंड व शिरूर या तालुक्‍यातील 149 गावांतील साधारणत ः 20 हजारापेक्षा अधिक शेतकरी-सभासदांच्या हितासाठी सहकारी तत्वावर यशवंत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, सहकार खात्याचे मंत्री, सरकारी अधिकारी व खासगी उद्योगपती एकत्र आल्यास कारखान्याचा कारभार कसा गुंडाळला जातो; याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंत सहकारी साखर कारखान्याची अवसायन प्रक्रिया आहे, असे ऍड. योगेश पांडे यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)