यशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा आपकडून निवडणूक लढणार?

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपर्कात आम आदमी पक्ष (आप) आहे. आपच्या प्रयत्नांना यश आल्यास दोन्ही सिन्हा पुढील लोकसभा निवडणूक त्या पक्षाच्या तिकिटांवर लढवतील.

यशवंत सिन्हा यांनी याआधीच भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांच्या समवेत शत्रुघ्न सिन्हा सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. आता नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न आपने सुरू केले आहेत. त्या पक्षाने पश्‍चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव शत्रुघ्न सिन्हा यांना दिला आहे. मात्र, ते बिहारमधील पाटणा साहिब हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याचे समजते. माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी आणि भाजपचे बंडखोर खासदार किर्ती आझाद हेही आप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालू महिन्याच्या प्रारंभी नोएडात झालेल्या जन अधिकार रॅलीच्या निमित्ताने दोन्ही सिन्हा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)