यवत येथे शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा

केडगाव- येत्या शनिवारी दौंड तालुक्‍यातील यवत (ता. दौंड) येथे शनिवारी (दि. 2) या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा होत असून यानिमित्ताने बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.
मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याने हे नेते केंद्र आणि राज्यातील शिवसेना-भाजपा युती शासनावर टीकास्त्र सोडणार असल्याने नागरिकांमध्ये याबाबत औत्सुक्‍य आहे. “निर्धार परिवर्तनाचा’ या युक्तीखाली “परिवर्तन झालेच पाहिजे, हे शासन गेलेच पाहिजे’ असे ब्रीद घेऊन हा मेळावा होत आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार तालुक्‍यात पिछाडिवर पडले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या नवख्या महादेव जानकर यांनी तालुक्‍यात 25 हजारांची आघाडी घेत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला, तर विधानसभा निवडणुकीत त्याच पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला, याची सल आजही पक्षाला असल्याने शनिवारी होणाऱ्या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाचे वैभव परत मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. यासाठी माजी आमदार रमेश थोरात जातीने लक्ष घालीत असून त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची त्यांनी खुटबाव येथे बैठक घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)