यवत ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन लुटला वनभोजनाचा आनंद

यवत- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेले पाच दिवसांपासून राज्यभर आंदोलने, मोर्चे, रास्तारोको, गावे बंद ठेवणे असे प्रकार सुरू आहेत. मात्र, रविवारी (दि.29) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यातील यवत हे गाव आज शेकडो वर्षांची परंपरा जपण्यासाठी बंद पाळीत असून वनभोजनाचा आनंद लुटीत आहेत.
यवत गावचे ग्रामस्थ शेकडो वर्षांची परंपरा जपत पारंपरिक पद्धतीने आषाढ महिन्यात दरवर्षीप्रमाणे एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवत गावच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आनंद लुटत असतात. या परंपरेप्रमाणे रविवारी ( दि.29) ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवत गावच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आनंद लुटला. यामध्ये आबालवृद्ध, नागरिक, महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होत आनंद लुटला. यवत हे गाव पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वीस हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले आणि मध्यवर्ती बाजारपेठ असलेले गाव आहे. या गावाने शेकडो वर्षांची परंपरा जपत आज श्री भैरवनाथ देवाची आणि महालक्ष्मीची पालखीची ग्रामप्रदक्षिणा घालीत यानंतर संपूर्ण गावातील रहिवाशी घराला कुलुप लाऊन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले.
यावेळी गावातील हॉटेल, किराणा दुकानदार आदी व्यवसायिकांनी आपआपली दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवारी असल्याने बॅंका, शाळा, विद्यालये, शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने गावात शुकशुकाट पाहायला मिळाला. नुकतेच दि.25जुलै रोजी यवत ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यवत गाव कडकडीत बंद ठेवले होते. जणू एखादा संप असल्यावर कडकडीत बंद पाळण्यात येतो. त्याप्रमाणे रविवारी गाव बंद असल्याचे जाणवत होते. तसेच गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना सुद्धा गावात कोणत्याही प्रकारचा प्रवेश मिळू नये, यासाठी गावात प्रवेश करणाऱ्यांना रस्त्यावर दोरी लाऊन प्रवेश नाकारण्यात येत होता. बाहेरील नागरिकांना गाव बंद असल्याबाबत सांगण्यात आल्यावर कुतूहल वाटत होते. अबालवृद्ध आणि महिलांनी गावच्या शिवेवर आणि आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जात गोडधोड जेवण तयार करून वनभोजनाचा आनंद लुटला. यानंतर सर्व नागरीक, आबालवृद्ध, महिला आदी सायंकाळच्या सुमारास घरी परतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)