यवतमाळ एमआयडीसी भूसंपादन प्रकरणी चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश

मुंबई: यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा, पांगरी, भारी मडकोना येथील विविध प्रकल्पासाठी  एमआयडीसीमार्फत भूसंपादन करण्यात आले होते. त्याचा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाढीव मोबदला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या प्रकरणात चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी संबंधितांना दिले.

मंत्रालय येथील दालनात आज उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ प्रकल्पासाठी एमआयडीसीमार्फत झालेल्या भूसंपादन प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाढीव मोबदल्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार, महसूल व वन विभागाचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तागडे, एमआयडीसीच्या महाव्यवस्थापक (विधी) स्मिता चावरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित  होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 पोटे-पाटील म्हणाले, न्यायालयीन आदेशानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष मोबदला मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. तेव्हा याबाबत समिती गठित करुन पडताळणी करुन अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देशही श्री. पोटे-पाटील यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)