हैदराबाद : यंदाच्या रब्बी हंगामात तेलंगणा राज्यात धानाचे ५७ लाख टन उत्पादन होणार आहे. पुरेशा प्रमाणात पाण्याचे व्यवस्थापन आणि २४x७ उपलब्ध असणारी वीज यामुळे मक्याचे उत्पादन ६८ लाख टन होण्याचा अंदाज आहे.
कालेश्वरम येथून पाण्याचा पुरवठा होत असल्याने तेलंगणा राज्यातील धान उत्पादन आणखी वाढणार असून हे राज्य देशाचे तांदळाचे कोठार होणार आहे.
पाण्याचा सुयोग्य आणि प्रमाणात वापर करण्यासाठी राज्याच्या पाटबंधारे विभागाने सिंचन विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. यामुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र वाढले असून पर्यायाने धान आणि मका या पिकांचे उत्पादन देखील वाढले आहे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0