यंदाच्या पावसाळ्यात पाच राज्यांत 465 बळी; सर्वांधिक महाराष्ट्रात

नवी दिल्ली – यंदाच्या पावसाळ्यात पाच राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत 465 जण मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्रातील सर्वांधिक 138 मृतांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राने दिली.

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये 125, पश्‍चिम बंगालमध्ये 116, गुजरातेत 52 तर आसाममध्ये 34 जणांचा बळी गेला. पूर आणि पावसाने महाराष्ट्रातील 26, पश्‍चिम बंगालमधील 22, आसाममधील 21, केरळमधील 14 तर गुजरातच्या 10 जिल्ह्यांना तडाखा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसाममधील 10 लाखहून अधिक नागरिक नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाले. त्यातील 2 लाखहून अधिक जणांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. त्या राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) 12 पथके मदत आणि बचाय कार्यात गुंतली आहेत. गुजरातमध्ये 15 हजार 912 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्या राज्यात एनडीआरएफची 11 पथके तैनात आहेत. महाराष्ट्रात एनडीआरएफची 3 पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)