यंदाच्या गणेशोत्सवात स्वदेशी लायटिंग

चायनीज साहित्यांची आवक कमी : भारतीय उद्योजकांना अच्छे दिन

सातारा, (प्रतिनिधी)- वर्षातला सर्वात मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव आता 15 दिवसांवर आलेला आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या ही वर्षी गणेशोत्सव धुमधडाक्‍यात साजरा करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारपेठांमध्ये आरास साहित्य मोठ्या प्रमाणात आणले आहे. मात्र, यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात विद्युत रोषणाईसाठी लावण्यात येणाऱ्या चायनीज माळांच्या मागणीचे प्रमाण कमी असून गणेशभक्तांना स्वदेशी विद्युत माळा घ्याव्या लागणार आहेत.
गेल्या वर्षी पर्यंत आरास करण्यासाठी विजेच्या माळांमध्ये चायनीज विजेच्या माळांचे प्रमाण मोठे होते. भारतीय बनावटीच्या माळांच्या तुलनेत त्या स्वस्त ही होत्या. गेल्या वर्षा पासून चीनशी भारताचे संबंध दुरावल्याने भारतामध्ये चीन मधील इलेक्‍ट्रॉनिक साहित्य येण्यावर परिणाम झाला आहे. आपसूकच त्याचा परिणाम सध्या साताऱ्याच्या बाजारपेठेत देखील दिसून येत आहे. गणेशोत्सवाला केवळ 15 दिवस बाकी असताना अद्याप चीन बनावटीचे विद्युत आरास साहित्य बाजारपेठांमध्ये दाखल झालेले नाही. बहुतांश दुकानांमध्ये जे काही चीनी बनावटीचे साहित्य आहे ते यापूर्वीचे असल्याचे व्यापारी सांगतात. चीनच्या मालाच्या आवकेवर घट झाल्याचा फायदा भारतातील इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवा उद्योजकांना होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या बाजारपेठत अनेक दुकानांमध्ये चायनीज विजेच्या माळा विक्रीसाठी कमी आहेत. तुलनेने स्वदेशी माळांची संख्या अधिक आहे. घरगुती गणेशोत्सव आरासासाठी 50 ते 100 बलब संख्येच्या
माळा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मोठ्या माळा देखील उपलब्ध झाल्या आहेत. त्याच बरोबर विद्युत रोषणाईचे बॉल्स, एलईडी ड्रॉप लाईट आदी साहित्य देखील उपलब्ध आहे. त्याच बरोबर विद्युत रोषणाईच्या सोबतीला संगीत व गीतांची साथ असावी यासाठी विविध कंपन्यांचे साऊंड सिस्टीम देखील गणेशभक्तांसाठी उपलब्ध आहे.

 भारतानेच चीन साहित्यावर बहिष्कार घातल्यामुळे आता भारतातील विद्युत रोषणाईच्या वस्तू तयार करणाऱ्या उद्योजकांना व कामगारांना लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिक देत आहेत. चायनीज सहित्यांच्या तुलनेत भारतीय वस्तूंची किंमत ही केवळ 10 टक्‍क्‍यांनी अधिक आहे मात्र चायनीज वस्तूंच्या तुलनेत आपल्या वस्तू टिकाऊ देखील आहेत असे व्यावसायिक सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)