यंदाची गणेशोत्सव सजावट थर्माकोलमुक्‍त?

पिंपरी – राज्य सरकारने घेतलेला प्लॅस्टिक बंदी निर्णयाचा सर्वात मोठा फटका यंदा व्यापारी वर्ग व गणेशोत्सव मंडळांना बसणार आहे. न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवल्याने व्यापारी वर्गावर संक्रातीची वेळ आली आहे. गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. परंतु, गणेशोत्सवात यंदा थर्माकॉलने तयार केलेल्या वस्तू व सजावट पाहावयास मिळणार नाही. व्यापारी वर्गाला लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी पर्यावरण प्रेमींकडून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यभरात प्लॅस्टिक बंदी लागू झाल्याने व्यापारी वर्ग अक्षरश: हवालदील झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 23 जूनला निर्णय झाल्यापासून प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीही सुरु झाली. शहरात प्रशासनाकडून प्लॅस्टिक पिशव्यासह थर्माकॉल जप्त करण्यात आले. प्लस्टिक पिशव्या अथवा थर्माकॉल बाळगळ्यास होणाऱ्या दंडाची रक्कमही मोठी असल्याने व्यापाऱ्यांनी या निर्णयाची धास्ती घेऊन प्लॅस्टिक विकणे बंद केले आहे. काही दुकानदार दुकानात राज्य सरकारचा प्लॅस्टिक बंदीचा अध्यादेश लावत आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने यंदाच्या वर्षी व्यापाऱ्यांना सूट द्यावी, अशी याचिका थर्माकॉल फॅब्रिकेटर आणि डेकोरेशन समितीने उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, न्यायालयान याचिका फेटाळून लावत निर्णय कायम ठेवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेशोत्सवात घरगुती सजावट केली जात होती. मात्र, काही वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव व घरगुती गणेशोत्सवांची सजावट करताना मोठ्या प्रमाणात थर्माकॉलचा वापर करुन मखरांची विक्री केली जात होती. मात्र, या निर्णयामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव पारंपारिक रंग-बेरंगी कागद, कापडांची सजावट यंदा पाहावयास मिळणार आहे. यामुळे, पारंपारिक वस्तूंची यंदा मागणी वाढणार आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागातील अधिकारी संजय कुलकर्णी म्हणाले,””पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या दृष्टीने प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी प्लॅस्टिक व थर्माकॉलची विक्री केली जाईल त्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.”

थर्माकॉल पर्यावरणासाठी घातक आहे. न्यायालयाच्या प्लस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. थर्माकॉलचे विघटन होत नसून तो पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे. यामुळे, प्लॅस्टिक व थर्माकॉल हद्दपार होणे काळाजी गरज आहे.
– संदीप जगदाळे, पर्यावरण प्रेमी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)