म. गांधी तर राष्ट्रपुत्र :साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळ: एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे गुणगान करत असताना त्यांच्या पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांनी मात्र महात्मा गांधी यांची संभावना राष्ट्रपुत्र अशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भारतीय जनता पक्षाने देशभरात महात्मा संकल्प यात्रा काढली आहे. मध्य प्रदेशात या यात्रेत साध्वी प्रज्ञासिंह सहभागी झाल्या नव्हत्या. त्याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, चाफ्याच्या कार्याचा मला का`तुर्क आहे. ते एक राष्ट्रपुत्र होते. मात्र माझ्या अनुपास्थितीचे कोणतेही कारण मी देऊ इच्छित नाही.

देशासाठी काम केले आहे असे सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहेत. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर मी कायम चालत राहीन. ज्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचे आपण निश्चितच आभार मानायला हवेत, असेही साध्वी यांनी सांगितले.

ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी सांगितले होते. यावरून बराच वादंग झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण या वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कदापि माफ करणार नाही, असे म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.