म्हसवडमध्ये चक्का जाम

मराठा आंदोलकांनी सातारा-पंढरपूर मार्ग रोखला

म्हसवड, दि. (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर म्हसवड परिसरासह ग्रामीण भागातील बहुसंख्य सकल मराठा समाजाने म्हसवड बंद ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यावेळी बसस्थानक चौकात आंदोलकांनी तब्बल चार तास सातारा- पंढरपूर राज्यमार्ग रोखला.
मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूकमोर्चे काढले. परंतु, राज्य सरकारने समाज्याला आरक्षण दिले नाही. आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत मराठा स्वस्थ बसणार नाही, अशा घोषणा देत म्हसवडसह ग्रामीण भागातील सकल मराठा समाज यात्रा पटांगणावर एकत्रित आला होता. सकाळी शांततेत मोर्चा सिध्दनाथ मंदिरापासून सुरवात होऊन मुख्य पेठेतून छ. शिवाजी महाराज चौकातून महात्मा फुले चौक, बसस्थानक चौक मार्गे सातारा-पंढरपूर राज्यमार्गावर आला. यानंतर रास्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा आरक्षण जाहीर करावे, सरकारने जी नोकर भरती जाहीर केली आहे तिला आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत स्थगिती द्यावी, बिंदू नामावली नोंदवहीत बेकायदेशीर खुल्या प्रवर्गाच्या जागा अतिरीक्त केलेल्या आहेत. त्या दुरूस्त करणे व तोपर्यंत नोकर भरतीस स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे व नायब तहसिलदार यांना देण्यात आले. दरम्यान, म्हसवडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठेत शुकशुकाट होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेंदूर, आठवडी बाजारामुळे गुरुवारी बंदची हाक
मराठा समाजाने बुधवारी सातारा बंदची हाक दिली होती. मात्र बुधवारी म्हसवडचा आठवडी बाजार व बेंदूर सण असल्यामुळे शेतकरी बांधवाचे व व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मराठा समाजाने गुरवारी बंदचे आयोजन केले. त्यास सर्व शहरवासियांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)