पटना : जगाचा विरोध पत्करून आपल्या विद्यार्थिनीसोबत विवाह करणारे बिहारी प्राध्यापक मटुकनाथ हे सध्या चर्चेत आले आहेत. कारणही तसेच आहे, ते म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेला एकटेपणा. प्रेमासाठी पत्नीला सोडणाऱ्या 64 वर्षीय मटुकनाथ यांची प्रेयसीही त्यांना सोडून गेली आहे. त्यामुळे या लव्हगुरूंच्या नशिबी आता एकाकीपण आले आहे. दरम्यान, प्रेमासंदर्भातल्या त्यांच्या विचारामुळे त्यांना लव्हगुरूही म्हटले जायचे.
काही वर्षांपूर्वी लव्हगुरू प्राध्यापक मटुकनाथ आणि आणि त्यांची विद्यार्थिनी ज्युली कुमारी यांची लव्हस्टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर मटुकनाथ यांनी पत्नीला सोडत ज्युलीसोबत संसार थाटला होता. मात्र त्यांची ही लव्हस्टोरी आता वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यांची प्रेयसी ज्युलीने सध्या अध्यात्माच्या दिशेने पावले वळवली आहेत. त्यामुळे मटुकनाथ यांच्यावर सध्या एकाकी जीवन जगावे लागत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा