…म्हणून बिग बॉसचं घर पुन्हा बनलं कुस्तीचा आखाडा

मराठी बिग बॉसच्या घरामध्ये ‘अंडे का फंडा’ हे साप्ताहिक कार्य रंगलं. या आठवड्यामध्ये घरातील सर्व सदस्य कर्णधारपदाचे उमेदवार आहेत. या कार्यामध्ये यशस्वी ठरणं म्हणजे थेट नवव्या आठवड्यामध्ये पोहोचण्याची संधी आहे. कर्णधारपदाच्या या टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. सुशांत आणि रेशम यांच्या नावाचं अंडं सुरक्षित करण्यामध्ये त्यांचे समर्थक यशस्वी झाले. तर मेघा आणि जुईचं नाव असलेलं अंडं नष्ट करण्यात आलं. 

हे कार्य पार पाडत असताना बिग बॉसचं घर पुन्हा एकदा कुस्तीचा आखाडा बनल्याचं पाहायला मिळालं. काल ‘अंडे एका फंडा’ या कार्यादरम्यान सदस्य शक्तीप्रदर्शन करताना दिसले. एकमेकांना ओढणं, शारीरिक हिंसा करणं हा प्रकार यापूर्वीही घडला होता. तेच चित्र पुन्हा एकदा दिसलं. यावरून बिग बॉसने सदस्यांना सक्त ताकीद दिली की, हा प्रकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अमान्य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)